dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला मारहाण; आमदारांचे वाहन असल्याने टोल देण्यास विरोध

Dhule News : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून इंदूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाला शिरपूर टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबविले. मात्र टोल भरण्यास नकार देत वाहनातील काही जणांनी टोल कर्मचाऱ्याला मारहाण

भूषण अहिरे

धुळे : शिंदे गटाच्या आमदाराचे वाहन घेऊन कार्यकर्ते जात असताना शिरपूर टोलनाक्यावर टोल भरण्यास विरोध केला. आमदाराचे कार्यकर्ते आहोत असे सांगून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर टोलनाक्यावर घडला आहे.  

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून (Mumbai Agra Highway) इंदूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाला शिरपूर (Shirpur) टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबविले. मात्र टोल भरण्यास नकार देत वाहनातील काही जणांनी टोल कर्मचाऱ्याला मारहाण करीत आम्ही आमदाराचे कार्यकर्ते आहोत; असा सज्जड दम देत टोलनाक्यावर गोंधळ घातला. विशेष म्हणजे त्यांच्या वाहनावर विधानसभा आमदाराचा लोगो व मागील काचेवर शिंदे गट शिवसेनेचा देखील लोगो असल्याचे दिसून येत आहे. 

पोलिसांनी वाहन जप्त करत लगेच सोडले 
सदर वाहनात कोणीही आमदार नसून कार्यकर्ते या वाहनाचा वापर करत असल्याचे दिसून आल्यानंतर टोल अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनास या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी येऊन हे वाहन ताब्यात घेतले. परंतु टोल प्रशासनातर्फे या संदर्भात कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात न दाखल केल्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना हे वाहन सोडून द्यावे लागले. परंतु हे वाहन जिल्ह्या बाहेरील नेमके कोणत्या शिंदे गटाच्या शिवसैनिक आमदाराचे होते हे मात्र कळू शकले नाही. दरम्यान आमदारांच्या नावाखाली कार्यकर्त्यांतर्फे गोंधळ घातल्याचा हा पहिलाच प्रसंग नसल्यामुळे राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा कार्यकर्त्यांना वेळीच आवर घालावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut water sweetness: फिकट की गडद? शहाळ्याचा रंगच सांगतो पाणी गोड आहे की नाही

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड

Ravi Varma Painting: पुण्यातील उद्योगपतीनं खरेदी केली १६७ कोटींची पेटिंग, नेमकं खास काय आहे?

ZP निवडणुकीनंतर शिंदे सेना अ‍ॅक्शन मोडवर; रायगडमधील शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Dombivli : कल्याण हादरले! ३ रिक्षा चालकाने महिलेवर केला सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT