Shirpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Crime News: घरी जावून झोपला तो उठलाच नाही; दारूच्या उधारीतून युवकाचा खून

घरी जावून झोपला तो उठलाच नाही; दारूच्या उधारीतून युवकाचा खून

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : दारूच्या उधारीच्या वादातून शहरातील वाल्मीकनगर (Shirpur) भागात युवकाला मारहाण करुन त्याचा खून झाल्याची घटना रविवारी घडली. शहर पोलिस (Police) ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

शिरपूर शहरातील वाल्‍मीकनगर परिसरातील राजू सुदाम कोळी (वय ३२) असे मृताचे नाव आहे. तो सेंट्रींग कामगार होता. त्याचा भाऊ राकेश कोळी याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मृत राजूला दारू पिण्याचे व्यसन होते. व्यसन भागवण्यासाठी तो किस्मतनगर येथे जाऊन दारू पीत होता. दारूच्या उधारीचे पैसे थकल्याने काही जणांशी त्याचा वाद झाला होता. संशयितांनी त्याला मारहाण करून जिवे मारण्याची (Crime News) धमकीही दिली होती.

घरी जावून झोपला तो उठलाच नाही

रविवारी दुपारी तो दारू पिण्यासाठी किस्मतनगरमध्ये गेला. त्यावेळी संशयितांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. ही बाब कळताच राजूचे भाऊ राकेश, गणेश व नीलेश भांडण सोडवण्यासाठी गेले. संशयितांनी त्यांनाही मध्ये पडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. भांडण सोडवल्यानंतर त्यांनी राजूला घरी नेले. त्यावेळी त्याच्या कानातून रक्तस्राव सुरु होता. घरी पोहचल्यावर राजू झोपून गेला. सायंकाळी सहाला त्याला झोपेतून उठवण्यासाठी गेले असता तो हालचाल करीत नव्हता. त्यामुळे त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मृत झाल्याचे घोषित केले. संशयित योगेश कोळी, बंटी कोळी, दीपक कोळी व छोटू कोळी यांच्याविरोधात शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT