Dhule News Police suspended Saam tv
महाराष्ट्र

Police suspended : थर्टी फस्टची ड्युटी सोडून मारली दांडी; कर्तव्यात कसूर करणारे सात पोलीस कर्मचारी निलंबित

Dhule News : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते,

भूषण अहिरे

धुळे : नववर्षाच्या सुरवातीलाच कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या सात कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांवर (Police Suspended) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Dhule) पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी कारवाईचा बडगा उगारत दणका दिला आहे. (Tajya Batmya)

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते, या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्हाभरात कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. (Dhule Police) त्यानुसार नेमलेली ड्युटी सोडून मोबाईल स्विच ऑफ करत सात पोलीस कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दांडी मारणाऱ्या या सात पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी निलंबनाची कारवाई करत कारवाईचा बडगा उगारल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी; या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षकांतर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकलूज मध्ये फेर मतदान घेण्याची मागणी

Maharashtra Politics: मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, एकनाथ शिंदेंना धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल

Maharashtra Politics : हायकोर्टाचा निर्णय, मतमोजणी लांबणीवर; मुख्यमंत्र्यांकडूनही आयोगावर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

SCROLL FOR NEXT