Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : भाड्याने वाहने नेत परस्पर विक्री; सहा जणांची टोळी धुळे पोलिसांच्या ताब्यात

Dhule news : धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहने भाड्याने नेण्याच्या नावाने वाहनांची परस्पर विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती

भूषण अहिरे

धुळे : कोण कशा पद्धतीने फसवणूक करेल हे सांगणे आता कठीण झाले आहे. त्यानुसार धुळ्यामध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. यात भाड्याने वाहने नेण्याच्या नावाखाली त्या वाहनांची परस्पर विक्री करणारी एक टोळी सक्रिय झाली होती. पोलिसांनी या टोळीचा फर्दाफ़ाश केला असून त्यांना दोन कारसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. 

धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहने भाड्याने नेण्याच्या नावाने वाहनांची परस्पर विक्री केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले होते. त्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे तालुका पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवली असता यात टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदर टोळीचा तपास लावत सापळा रचला. 

सापळा रचत सहा जण ताब्यात 

धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचून कारवाई  केली आहे. या कारवाईत भाड्याने वाहने नेण्याच्या नावाखाली परस्पर वाहनांची विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून दोन कारसह काही मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. या प्रकरणी पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

पुन्हा एकदा चार चाकी वाहनांची तोडफोड
पिंपरी चिंचवड
: शहरातील साने चौकातील सिद्धी पार्क परिसरात चार चाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलाने मध्यरात्री अंमली पदार्थाच्या नशेत वाहनांची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यात जवळपास १० ते १५ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन मुलाला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र या घटनेमुळे साने चौक परिसरातील नागरिकात दहशतीचा वातावरण निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा २० वर्षानंतर निकाल लागला, पद्मसिंह पाटील निर्दोष, ओमराजेंना धक्का; कोर्टात नेमकं काय झालं?

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

SCROLL FOR NEXT