bus
bus 
महाराष्ट्र

जमीन धसल्याने बसही उलटली; सुदैवाने जीवित हानी टळली

भूषण अहिरे

धुळे : मुसळधार पावसाने राज्‍यात हाहाकार माजवला असताना धुळे जिल्‍ह्यात रिमझिम पाऊस होत आहे. यामुळे देखील रस्‍त्‍यांची समस्‍या होत आहे. यात वालखेडा गावाजवळ रस्‍त्‍याच्‍या कडेवरची जमिन खचल्‍याने प्रवाशांनी भरलेली बस उलटली. सुदैवाने यात हानी झाली नाही. (dhule-news-rain-droped-and-road-crash-bus-accident)

शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा गावाजवळ सोनगीरहून अमळनेरकडे जाणारी बस (क्र. MH २०, BL १४१८) रस्त्याच्या खाली उतरताच भुसभुशीत झालेल्या जमिनीमुळे जागीच पलटी झाली. जमीन धसल्यामुळे ही बस अचानक पलटी झाली आहे. बसमध्ये १५ ते २० प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नसून सुदैवाने या दुर्घटनेमध्ये जीवित हानी टळली आहे.

प्रवाशी झाले भयभीत

अचानक रस्‍त्‍यावरून बस पलटी झाल्‍याने सर्व प्रवासी भयभीत झाले होते. आरडाओरड देखील झाली. मात्र बसचा खालचा भाग टेकला गेल्‍याने बस उलटी झाली झाली नाही. यामुळे प्रवाशांना इजा झाली नाही. परिसरातील नागरिकांनी तात्काळ सर्व प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले. या दुर्घटनेमध्ये बसच्या एका बाजूच्या संपूर्ण काचा फुटल्याने बसे नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar News: केवळ एका मतासाठी; पठ्ठ्याने दुबईवरून थेट संभाजीनगर गाठलं, हजारो किमीचा प्रवास

Maharashtra Election Voting LIVE : राज्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

Chandrashekhar Bawankule: महाविकास आघाडीचा फुगा फुटणार : चंद्रशेखर बावनकुळे, Video

Ravindra Waikar Meet Raj Thackeray | रवींद्र वायकरांसाठी राज ठाकरे सभा घेणार?

Pune Lok Sabha Election : मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांनाही दिला मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT