Dhule Rain Saam tv
महाराष्ट्र

Dhule Rain : धुळे जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पेरण्या खोळंबल्या, प्रकल्पांमध्ये मात्र मुबलक जलसाठा

Dhule News : नाशिक जिल्ह्यात देखील सकाळपासून जोरदार पाऊस होत असल्याने अनेक भागात पूरजन्य परिस्थिती आहे. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यात जून महिना संपत आला तरी देखील समाधानकारक पाऊस नाही

भूषण अहिरे

धुळे : राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली तरी धुळे जिल्ह्यात अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मे महिन्यात झालेल्या पावसामुळे यंदा जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याची माहिती सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

एकीकडे राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात देखील सकाळपासून जोरदार पाऊस होत असल्याने अनेक भागात पूरजन्य परिस्थिती आहे. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यात जून महिना संपत आला तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु जुलै महिन्यापर्यंत संपूर्ण जिल्ह्याला पुरेल इतका जलसाठा जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये आहे. मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वात जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे.  

धुळे शहराला पाणीटंचाईची चिंता नाही 

धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावाची साठवण क्षमता २८४ एमसीएफटी असून सध्या त्यात २८२ एमसीएफटी जलसाठा आहे. मागील वर्षी याच काळात २७४ एमसीएफटी पाणीसाठा नोंदवला गेला होता. जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प तसेच नकाणणे तलाव या सर्वांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्यामुळे यावर्षी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता नाही; अशी माहिती उपकार्यकारी अभियंता महाले यांनी दिली आहे.

वाशिम जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
वाशीम
: वाशिम जिल्ह्यात आज मान्सूनच्या पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आभाळकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारंजा, रिसोड, मालेगाव आणि वाशिम तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली असून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. तर उर्वरित भागात पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्याला वेग येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT