Dhule Corporation News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation News: रेड्याला सोबत घेत मोर्चा काढून निषेध; शिवसैनिकांचे पालिकेवर अनोखे आंदोलन

रेड्याला सोबत घेत मोर्चा काढून निषेध; शिवसैनिकांचे पालिकेवर अनोखे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : धुळे महापालिका प्रशासनाच्या वाढीव घरपट्टी धोरणा विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक (Shiv Sena) चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. पालिका (Dhule News) प्रशासनाचा निषेध करण्यासाठी थेट महापालिकेवर रेडा घेऊन जात निषेध करण्यात आला आहे. (Live Marathi News)

धुळे शहरात गेल्या दोन वर्षांपुर्वी एका खाजगी कंपनीला ठेका देऊन जिओ मॅपिंग व ङ्रोनद्वारे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण केल्यानंतर (Dhule Corporation) महानगरपालिकेत सध्या कार्यरत असलेल्या स्थायी समिती व सभागृहाची जनरल बाॅङी मिटींगमध्‍ये वाढीव घरपट्टी संदर्भात ठराव मंजूर करणे, मुंबई महानगर पालिका अधिनियम १९४९ नुसार क्रमप्राप्त होते. तसे न करता मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वसुली विभागाने मनमानी पध्दतीने काम केले.

मनमानी पद्धतीने नोटीसा

पहिल्या टप्प्यात सुमारे २४ हजार ५०० पुनर्मूल्यांकन केलेल्या मालमत्ता धारकांपैकी ११ हजार ५०० मालमत्ता धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे आंदोलकांतर्फे सांगण्यात आले. अशाच पध्दतीने धुळे महापालिका टप्प्यांटप्प्यांत सर्व शहरातील मालमत्ता धारकांना या नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे म्हणत हा सर्व प्रकार नियम धाब्यावर बसवून सुरू असल्याचे आंदोलकांनी म्हणत या विरोधामध्ये तीव्र आंदोलन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT