Onion Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: धुळ्यात कांदा प्रश्न पेटला; कांदे फेकून केंद्र सरकारचा निषेध

धुळ्यात कांदा प्रश्न पेटला; कांदे फेकून केंद्र सरकारचा निषेध

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात कांदा प्रश्न पेटला असून केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणाविरुद्ध ठाकरे गट शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठाकरे गट शिवसैनिकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून धुळे (Dhule) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर (Onion) कांदे फेकून केंद्र सरकारचा निषेध केला आहे. (Latest Marathi News)

कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या विरोधात राज्यभरात आंदोलन करत निर्णयाचा निषेध केला जात आहे. त्यानुसार धुळ्यात देखील ठाकरे गट शिवसेनेने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा आणत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी (Shiv Sena) आक्रमक शिवसैनिकांनी कांदे फेकून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन देखील केले,

निर्णय रद्दची केली मागणी 
पोलिसांनी तात्काळ आक्रमक आंदोलकांना ताब्यात घेतले असून यावेळी संतप्त ठाकरे गट शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील केल्याचे बघावयास मिळाले. केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांविरोधात घेतलेला निर्णय रद्द करावा अशी यावेळी संतप्त शिवसैनिकांनी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Motorola Edge 70 : मोटोरोलाच्या फोनमध्ये आहेत ‘हे’ दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत किती?

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान

प्रवाशांसाठी खुशखबर! कोकण अन् सिंधुदुर्गला ८ गाड्यांचा थांबा; कधीपासून होणार सुरूवात?

ONGC Recruitment: खुशखबर! ONGCमध्ये नोकरीची संधी; २६२३ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai Metro: मुंबईकारांसाठी गुड न्यूज! घाटकोपर- वर्सोवा मेट्रो होणार ६ डब्यांची, प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार; काय आहे प्लान?

SCROLL FOR NEXT