Dhule Police Saam tv
महाराष्ट्र

Dhule Police : अवैध दारूभट्ट्या उध्वस्त; एक लाखाचा मुद्देमाल जप्त, धुळे तालुका पोलिसांची कारवाई

Dhule News : पोलिसांच्या पथकाने कुळथे शिवारातील धनगरे डाब परिसरात वाल्मीक भावराव सोनवणे आणि देवसिंग सुरमल मोरे यांनी लावलेल्या दोन दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या

भूषण अहिरे

धुळे : अवैधरित्या दारूची निर्मिती करून त्याची विक्री करण्याचा धंदा जोरदार सुरु आहे. अशाच प्रकारे धुळे तालुक्यात अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी तालुका पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या कारवाईनंतर पोलिसांकडून अवैध दारूचे अड्डे उध्वस्त करण्याची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

धुळे तालुक्यातील कुळथे आणि हरणमाळ परिसरात अवैधपणे दारूची निर्मिती करून त्याची विक्री करण्यात येत होती. दरम्यान धुळे तालुका पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांना वरिष्ठांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली असून तालुक्यातील कुळधे व हरणमाळ येथे अवैध दारूची विक्री अड्ड्यांवर धाड टाकत कारवाई केली आहे. 

तीन हातभट्ट्या केल्या उध्वस्त 

कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या पोलिसांच्या पथकाने कुळथे शिवारातील धनगरे डाब परिसरात वाल्मीक भावराव सोनवणे आणि देवसिंग सुरमल मोरे यांनी लावलेल्या दोन दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. तसेच हरणमाळ गावाच्या शिवारात विजयानंद देवानंद उफाडे याने लावलेली दारू हात भट्टीही उद्ध्वस्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

तीन अवैध दारू भट्ट्यांवर धाड टाकत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू, रसायन आणि साहित्य नष्ट केले आहे. तसेच याठिकाणाहून एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात वाल्मीक सोनवणे, देवसिंग मोरे आणि विजयानंद उफाडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT