Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

Dhule News : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

भूषण अहिरे

धुळे : दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या (Dhule) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून (Crime News) गावठी कट्टा व दोन जिवंत कार्तुस जप्त केले आहेत. (Latest Marathi News)

धुळे शहर परिसरातील मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या पिंपळादेवीनगर परिसरातील सराईत गुन्हेगाराकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असून तो चाळीसगाव रोड पोलीस (Police) ठाण्याच्या परिसरामध्ये वावरत असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधीत ठिकाणी पोहचून शहानिशा केली असता, संबंधित सराईत युवक हा गावठी बनावटीच्या पिस्तुलासह पोलिसांना आढळून आला.  

पोलिसांनी तात्काळ त्यास ताब्यात घेतले असता त्याकडून दोन जिवंत कार्तुस व गावठी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले आहे. संबंधित संशयिताने हे गावठी बनावटीचे पिस्तूल का व कुठून आणले. त्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक करीत असून, या कारवाईदरम्यान जवळपास ४० हजाराहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT