Dhule News saam tv
महाराष्ट्र

Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोको

Dhule News : महापालिका व पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी रास्ता रोको करत पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहर महापालिकेकडून अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात आहे. दरम्यान अतिक्रमण कारवाई वेळी भाजी विक्रेत्या महिलेला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांकडून करण्यात आला आहे. यामुळे संतप्त विक्रेत्यांकडून आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

धुळे शहरात ठिकठिकाणी अतिक्रमक काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत आज दत्त मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून भाजी विक्रीचा व्यवसाय केला असून याठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात येत असताना मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यातच एका महिला भाजी विक्रेतीला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप इतर विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. 

पोलीस व मनपा प्रशासनाची संयुक्त कारवाई  

शहरातील दत्त मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला बसून भाजी विक्रेते आपला व्यवसाय करतात. वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेऊन महानगरपालिकेने या विक्रेत्यांना नवरंग पाण्याच्या टाकीजवळ जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्या नवीन जागेवर सतत पाणी साचत असल्याने आणि व्यवसाय होत नसल्याने विक्रेते पुन्हा आपल्या जुन्या जागी परतले. यामुळे आज पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्यावर संयुक्त कारवाई सुरू केली.  

रास्ता रोको करत निलंबनाची कारवाई 

कारवाई करत असताना पोलीस आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. याचवेळी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने भाजी विक्रेत्या महिलेला धक्काबुक्की करून मारहाण केली; असा गंभीर आरोप उपस्थित विक्रेत्यांनी केला. या प्रकारामुळे विक्रेत्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. तसेच मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR filing: ITR भरण्यासाठी उरले २४ तास; फक्त १० मिनिटांत घरबसल्या रिटर्न भरा, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Railway Accident : नागपुरात भयंकर दुर्घटना! रेल्वे रुळावर २ भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले; नेमके काय घडले?

ठाण्याच्या विकासाला नवी झळाळी! सिद्धेश्वर तलावाजवळील ५० एकरांहून अधिक क्षेत्रात उभारणार ‘ग्रेड A+’ व्यावसायिक प्रकल्प

पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT