Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांच्या फोटोला फासले काळे

शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांच्या फोटोला फासले काळे

भूषण अहिरे

धुळे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य वारंवार केली जात आहेत. या विरोधात धुळ्यात (Dhule) आज शिवप्रेमींनी आंदोलन करत बेताल वक्‍तव्‍य करणाऱ्यांच्‍या प्रतिमेला काळे फासून आंदोलन केले. (Breaking Marathi News)

यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असून यामुळे (Dhule News) शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील सकल मराठा समाज व शिवप्रेमींनी एकत्र येत मनोहर चित्र मंदिराजवळ छत्रपतींच्या स्मारकाजवळ अवमान करणाऱ्यांच्या प्रतिमेस काळे फासून आंदोलन केले. यावेळी छत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यापालांसह नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. त्याखाली 'हे सारे अकलेचे गाढव आहेत..!' अशा आशयाचा मजकूर असलेले पोस्टर झळकवत पोस्टवरील वाचाळवीरांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले.

सत्‍ताधारी नेत्यांच्या घरावर नेणार मोर्चा

या वक्‍तव्‍याच्‍या विरोधात आक्रमक पवित्रा घेत शिवप्रेमींच्यावतीने येत्या काही दिवसात सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या घरासमोर मोर्चा नेत आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे. यावेळी जमलेल्या सर्व आंदोलकांतर्फे घोषणाबाजी करून आपला तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT