Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : बसवरील मंत्र्यांच्या फोटोंना फासले काळे; धुळ्यातही आंदोलक आक्रमक

Dhule News : बसवरील मंत्र्यांच्या फोटोंना फासले काळे; धुळ्यातही आंदोलक आक्रमक

भूषण अहिरे

धुळे : मराठा आरक्षणाची धग राज्यातील प्रत्येक शहरात पोहचली आहे. त्यानुसार धुळ्यात (Dhule) देखील आंदोलन सुरु आहे. आंदोलनादरम्यान मराठा आंदोलक संतप्त झाले असून आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) आंदोलकांनी एसटी बसवरील राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या फोटोंना काळे फसले आहे. (Maharashtra News)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत धुळ्यात देखील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने उपोषण सुरू आहे. या दरम्यान संतप्त मराठा आंदोलकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासून राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध केला. 
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारच्या विरोधात घोषणाबाजी 
आंदोलनाची धग धुळ्यात पोहोचली असून आंदोलक संतप्त झाले. मराठा आंदोलकांनी परिवहन विभागाच्या एसटी बसेसवर राज्य सरकारच्या लावण्यात आलेल्या जाहिरातींच्या फोटोंवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पंतप्रधानांच्या फोटोंना काळे फासत राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT