Dhule News Panjra Rivre Saam tv
महाराष्ट्र

पांझरा नदी पहिल्यांदाच वाहू लागली दुथडी

पांझरा नदी पहिल्यांदाच वाहू लागली दुथडी

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील पांझरा नदी यंदा पहिल्यांदाच दुथडी भरून वाहू लागली आहे. साक्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर अक्कलपाडा (Dhule News) धरणाच्या पाणी पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळेच प्रशासनातर्फे अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. (dhule news Panjra river started flowing for the first time)

दोन–तीन दिवसांपासून धुळे, नंदुरबार (Nandurbar) जिल्‍ह्यात पाऊस (Rain) पडत आहे. यामुळे जवळपास सर्वच नद्यांना पुर आला आहे. दरम्‍यान वर्षभर कोरडी असलेली पांझरा नदी यंदा पहिल्यांदाच दुथडीवरून वाहू लागली आहे. पांझरा नदीला पूर आल्यामुळे छोटा पूल हा पाण्याखाली गेला आहे.

पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन

यंदाच्या वर्षी पांझरा नदी पहिल्याच पावसात दुथडी भरून वाहू लागली असल्यामुळे परिसरातील नागरिकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला जात नाही. सेल्फीच्या नादात कुठलीही अनुचित घटना घडू नये; यासाठी पोलीस (Police) प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT