Dhule Factory Blast Saam tv
महाराष्ट्र

Dhule Factory Blast: मेणबत्तीच्या कारखान्‍यातील स्फोटात आणखी एक महिलेचा मृत्यू

मेणबत्तीच्या कारखान्‍यातील स्फोटात आणखी एक महिलेचा मृत्यू

भूषण अहिरे

धुळे : साक्री येथील चिपलीपाडा येथे मेणबत्तीच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात (Dhule News) आणखी एक महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत घटनास्थळी ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. परंतु उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल असलेल्या आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

चिपलीपाडा येथे मेणबत्ती बनविण्याचा कारखाना होता. यात मंगळवारी दुपारच्‍यावेळी अचानक स्‍फोट होवून काम करत असलेल्‍या चार महिलांचा जागीच मृत्‍यू झाला होता. तर उपचारादरम्‍यान महिलेचा मृत्‍यू झाल्‍याने मृतांची संख्या आता ५ झाली आहे. मृतांमध्ये 15 वर्षीय बलिकेचा देखील समावेश आहे. अद्याप आणखी एका महिलेवर नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फटाके देखील बनविले जात होते

विशेष म्हणजे मेणबत्तीच्या नावाने फटाके बनवण्याचा देखील कारखाना सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांतर्फे मृतांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे देखील मृतांच्या कुटुंबियांना आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT