Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लेख; कंपनी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लेख; कंपनी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या (Dhule News) इंडक टेल्स वेबसाईट कंपनी विरोधामध्ये (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. या विरोधात धुळ्यात निषेध करत आंदोलन करण्यात आले. (Latest Marathi News)

इंडक टेल्स नामक वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक (Savitribai Phule) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या कामाबद्दल इंडक टेल्स यांच्या लेखात अतिशय अपमानकारक भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना भाजप व शिंदे गटातर्फे प्रोत्साहन दिले जात असल्याचा देखील आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलकांनी लावला आहे.

आंदोलन करत निषेध

आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या कंपनीविरोधात राष्‍ट्रवादीने आंदोलन केले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT