महाराष्ट्र

महिलांचे पारंपारिक अहिराणी गीते गात वरुण देवतेला आळवणी

महिलांचे पारंपारिक अहिराणी गीते गात वरुण देवतेला आळवणी

भूषण अहिरे

धुळे : खानदेशात यंदा पावसाची कृपादृष्‍टी राहिलेली नाही. शेतकरी हवालदील झाला आहे. पिके संकटात असून पाऊस लांबला तर पिकांचे नुकसान होईल. यामुळे वरुण देवतेला प्रसन्‍न करण्यासाठी महिला वर्गाने अहिराणी गीत गावून साकळे घातले. (dhule-news-no-rain-droped-women-ahirani-song-singing-and-come-rain-in-kapdane-village)

ऑगस्ट महिना सुरू झाला तरीदेखील अद्याप धुळे जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांसह नागरिकांसमोर पिण्याचा पाण्याचा देखील मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळेच वरुण राजाला आवळणी करण्यासाठी धुळे तालुक्यातील कापडणे शिवारातील महिलांनी अहिराणी भाषेत गाणे म्हणत वरुणराजाला आवळणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

पावसाला उशीर झाला की डोक्यावर घागर तसेच निंबाचा पाला घेऊन खानदेश भागांमध्ये धोंड्या धोंड्या पाणी दे अशा पद्धतीचा उपक्रम राबवून वरुणराजाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करण्याची प्रथा आहे. तसाच काहीसा प्रयत्न या महिला वर्गातर्फे खानदेशी भाषेत गाणी म्हणत डोक्यावर घागर व निंबाचा पाला घेऊन वरुणराजाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पद्धतीने वरुण राजाला आवळणी केल्यानंतर पावसाला सुरुवात होते. अशी धारणा खान्देश वासियांची असल्यामुळे या महिलांकडून हा प्रयत्न करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात

Bollywood Actor : चालणं-बोलणंही झालेलं कठीण; ब्रेन स्ट्रोकनंतर बॉलिवूड अभिनेत्याचं बदललं संपूर्ण आयुष्य, रोज घ्यावी लागतात ८ औषधे

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरात होतात 5 जबरदस्त बदल जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जाणून घ्या

Onion Rate Today : कांद्याने सर्वसामान्यांना रडवलं! प्रति किलो रुपये इतक्या रुपयांवर पोहोचला; आजचे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT