Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime: नऊ दुचाकीसह चोरी करणारी टोळी ताब्यात; धुळे एलसीबीची कारवाई

Dhule News : नऊ दुचाकी चोरून त्यांच्या ताब्यात ठेवल्या असल्याचे त्यांनी पोलीस तपासात कबूल केले

भूषण अहिरे

धुळे : शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याचा शोध पोलिसांकडून सुरु होता. या (Dhule) दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (Police) दुचाकी चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून चोरलेल्या नऊ बाईक देखील हस्तगत केल्या आहेत. (Tajya Batmya)

धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या गुरुद्वारा परिसरामध्ये पुलाखाली काही संशयित चोरटे हे काही दुचाकीसह उभे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास मिळाली होती. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथक घटनास्थळी पाठवले असता, त्या ठिकाणी तिघा चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. त्यांनी नऊ दुचाकी चोरून (Bike Theft) त्यांच्या ताब्यात ठेवल्या असल्याचे त्यांनी पोलीस तपासात कबूल केले. या संदर्भात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील नऊ दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तिघा आरोपींपैकी दोघ आरोपी हे विधी संघर्षित बालक असून या तिघा जणांनी मिळून या नऊ दुचाकी बाहेरील राज्यासह इतर जिल्ह्यांमधून चोरल्या असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. तसेच या चोरट्यांचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का? याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT