Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : दोन हजाराची लाच घेणे पडले महागात; पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल, नरडाणा पोलीस स्थानकात खळबळ

Dhule News : मोटारसायकल अपघात नरडाणा पुलाजवळ झाला होता. यामुळे सदरची मोटारसायकल नरडाणा पोलिसांनी जमा केलेली होती. त्या वाहनाची चौकशी करण्यासाठी तक्रारदार नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये गेले

भूषण अहिरे

धुळे : अपघातग्रस्त मोटारसायकल पोलीस स्टेशनमध्ये जमा होती. याबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या मोटारसायकल मालकाला उपस्थित पोलीस कॉन्स्टेबलने दोन हजार रुपयांची मागणी केली. सदरची रक्कम स्वीकारणे पोलीस कॉन्स्टेबलला चांगलेच महागात पडले असून रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. यामुळे नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली आहे. 

धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस स्टेशनचे गजेंद्र पावरा असे लाच घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तक्रारदार हे शिरपूर तालुक्यातील दोंदवाडा गावचे रहिवासी असुन त्यांच्या चुलत भावाचा मोटारसायकल अपघात नरडाणा पुलाजवळ झाला होता. यामुळे सदरची मोटारसायकल नरडाणा पोलिसांनी जमा केलेली होती. त्या वाहनाची चौकशी करण्यासाठी तक्रारदार नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते.  

५ हजार रुपयांची केली मागणी 

तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये गेले असताना तेथे हजर असलेले पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र पावरा यांनी संबंधित मोटारसायकल पोलीस स्टेशनमध्ये जमा असल्याचे सांगितले. मात्र ती परत मिळवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. दरम्यान तक्रारदारांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.  

पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल 

प्राप्त तक्रारीची दखल घेत धुळे एसीबी पथकाने पडताळणी केली असता पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र पावरा यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली व ती स्वीकारण्यास तयारी दर्शवली. त्यामुळे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र पावरा यांच्याविरुद्ध नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT