Shindkheda Rain Saam tv
महाराष्ट्र

Shindkheda Rain : दरवर्षीच्या तुलनेत यंदा शिंदखेडा तालुक्यात जास्त पाऊस; बंधारे पाण्याने भरले तुडुंब

Dhule News : धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यात यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा शिंदखेडा तालुक्यातील प्रकल्प चांगल्या पद्धतीने भरले

भूषण अहिरे

धुळे : यंदा पावसाळा सुरु झाल्यानंतर सुरवातीला काही दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र यानंतर पाऊस सुरूच असल्याने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात आतापर्यंत झालेला पाऊस हा गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे तालुक्यातील बंधारे आतापासूनच पाण्याने तुडुंब भरले आहेत. 

धुळे (Dhule) जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यात यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील प्रकल्प चांगल्या पद्धतीने भरले असून बंधारे देखील ओसंडून वाहू लागले आहेत. तर बंधारे भरल्यामुळे परिसरातील विहिरी देखील चांगल्या प्रकारे भरल्याने यंदा शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांचा देखील पाण्याचा प्रश्न जवळपास मिटला आहे. आगामी काही दिवसात देखील अजूनपाऊस झाल्यानंतर बंधारे पाण्याने भरून वाहू लागतील; अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

दरवर्षी पर्जन्यमान असते कमी 
शिंदखेडा तालुक्यात दरवर्षी पर्जन्यमान (Rain) कमी होत असल्याने शिंदखेडा तालुका हा दुष्काळग्रस्त मानला जातो. परंतु यंदा धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाचे प्रमाण हे शिंदखेडा तालुक्यात झाले आहे. यामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठा दिलासा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT