Girish Mahajan
Girish Mahajan Saam tv
महाराष्ट्र

Girish Mahajan: यामुळे ‘तो’ मैत्रीचा प्रस्ताव स्‍वागतार्ह; मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

भूषण अहिरे

धुळे : युती संदर्भात कुठल्याही प्रकारचा विचार नसून सध्या जे शब्दाचे बाण एकमेकांवर चालवले जात आहेत. त्यामुळे राजकीय प्रतिमा मलिन होत आहे. हे शब्दांचे चालवले जाणारे बाण थांबविण्यासाठी सामनातून मांडण्यात आलेला प्रस्ताव स्वागतार्हय असल्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी स्पष्ट केले आहे. (Letest Marathi News)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून आज अग्रलेखाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मैत्रीचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रीया दिली. तर राज्यातून पुन्हा एक प्रकल्प गुजरातमध्ये (Gujrat) गेला असल्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना विचारणा केली असता या प्रश्नाला मंत्री गिरीश महाजन यांनी बगल दिली. या प्रश्नावर उत्तर देण मंत्री गिरीश महाजन यांनी टाळले आहे.

दोन– तीन दिवसात वाद मिटेल

रवी राणा व माजी मंत्री बच्चू कडू यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादावर देखील बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी रवी राणा यांच्याशी काही वेळापूर्वीच फोनवरून संवाद साधला. असे सांगत, बच्चू कडू यांच्याशी देखील हा वाद मिटवण्यासंदर्भात आमचे बोलणे सुरू असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवार मंगळवार पर्यंत रवी राणा व बच्चू कडू यांना एकत्र बसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा वाद मिटवतील असे स्पष्ट केले आहे.

प्रत्‍येक भाषेतून वैद्यकीय शिक्षण

वैद्यकीय शिक्षण हे मराठी भाषेतून सुरू करण्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिश भाषेमधून शिक्षण घेताना मोठ्या अडचणी येतात. त्या अडचणी दूर करण्यासाठीच हा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. मंत्री महाजन यांनी केंद्र सरकारतर्फे प्रत्येक राज्यांमध्ये त्या त्या भाषेतून तेथील शिक्षण देण्यात यावे; असा निर्णय घेण्यात आला असल्याने आम्ही हा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News Today: मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग करणं तरुणाला भोवलं! वांद्रे पोलिसांची मोठी कारवाई

Gunaratna Sadavarte News | सदावर्तेंना सहकार खात्याचा दणका! एसटी बॅंकेतील संचालकपद रद्द

Today's Marathi News Live : बीड जिल्ह्यात आज दोन दिग्गज नेत्यांच्या सभा

Mumbai News : नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा; हायकोर्टाने निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या

Negative Thoughts: सतत नकारात्मक विचार करताय? हे गंभीर आजार जडू शकतात

SCROLL FOR NEXT