Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : राणे कुटुंबीयांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; धुळ्यात फोटो जाळून केला निषेध

Dhule News : मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान नारायण राणे यांनी जरंगे पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे आहे.

भूषण अहिरे

धुळे : भाजप नेते नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात काल बोलताना अपशब्द वापरला. याच्या विरोधात (Dhule) धुळ्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले (Maratha Aarkshan) आहे. धुळ्यात मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राणे पिता पुत्रांचे फोटो असलेले बॅनर जाळून राणे कुटुंबीयांचा निषेध केला आहे. (Live Marathi News)

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान नारायण राणे (Narayan Rane) यांनी जरंगे पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे आहे. राणे कुटुंबीयांचा कोंबडी चोर असा उल्लेख करत संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी बोलताना राणे कुटुंबीयांनी तोंड सांभाळून बोलावे. त्यांना मराठा बांधव महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही; असा इशाराही दिला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पिता- पुत्राविरोधात घोषणाबाजी 

नारायण राणे त्याचबरोबर नितेश राणे यांच्या विरोधात मराठा समाजाच्या आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला आहे. यावेळी धुळे शहरातील स्वस्तिक चौकात राणे पिता पुत्रांच्या निषेधासाठी मराठा समाजाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकवटल्याचे बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

SCROLL FOR NEXT