Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : २ हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी अडकला; ACB ने असा रचला होता सापळा!

Shirpur News : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना जवखेडा येथील मंडल अधिकाऱ्याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी दोन हजारांची लाच (Bribe) घेताना जवखेडा (ता. शिरपूर) येथील मंडळ अधिकारी मुकेश श्रीकांत भावसार याला रंगेहाथ पकडण्यात आले. धुळे (Dhule) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. (Breaking Marathi News)

वरुळ (ता. शिरपूर) शिवारात असलेल्या शेतजमिनीची वाटणी करण्यावरून तक्रारदार आणि त्याची बहीण यांच्यात वाद होता. त्यांच्यात वाटणी करण्याबाबत शिरपूरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने आदेश दिला होता. या आदेशाची प्रत जोडून तक्रारदाराने तहसीलदारांकडे मागणी अर्ज सादर केला.

संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी अर्जावर कार्यवाही करून सातबाऱ्यावर नावनोंदणी करून दिली. (ACB) नोंदणीचे काम पूर्ण केल्यानंतर त्याच्या मोबदल्यात मंडल अधिकारी मुकेश भावसार यांनी तक्रारदाराकडे दोन हजारांची लाच मागितली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र तक्रारदाराने (Dhule ACB) धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. विभागातर्फे तक्रारीची खात्री करत दोन हजार रुपये स्वीकारताना गुरुवारी संशयित भावसार यांना पकडण्यात आले. मंडल अधिकारी यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

SCROLL FOR NEXT