Leopard Death Saam tv
महाराष्ट्र

Leopard Death : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; मुंबई आग्रा महामार्गावरील घटना

Dhule News : धुळे जिल्ह्यातून गेलेल्या मुंबई- आग्रा महामार्गावर ही घटना घडली आहे. महामार्गाच्या लगत असलेल्या जंगल परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे पाहण्यास मिळाले आहे

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लळींग घाटामध्ये मुंबई- आग्रा महामार्गावर बिबट्याचा (Leopard) रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस (Dhule) आली आहे. मृत बिबट्याचे वय साधारण पाच वर्ष असल्याचा अंदाज आहे. (Breaking Marathi News)

धुळे जिल्ह्यातून गेलेल्या मुंबई- आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) ही घटना घडली आहे. महामार्गाच्या लगत असलेल्या जंगल परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. अशाच प्रकारे जंगलातून महामार्ग ओलांडत असताना बिबट्याला वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याला तपासले असता त्यास मयत घोषित केले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत बिबट्याचे शवविच्छेदन केले असून त्यावर अंतिम संस्कार देखील करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती पशुवैद्यकीय अधिकारी भूषण वाघ यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी लातूर- अंबाजोगाई महामार्ग अडवला

कल्याणमधील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पेटला; पावसाळाच्या तोंडावर ३० हजार नागरिकांचा जीव धोक्यात

महाराष्ट्र ते दिल्ली काँग्रेसमध्ये होणार मोठा फेरबदल; थेट सात राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

Petrol Price : पेट्रोल - डिझेल २२ रुपयांनी स्वस्त; इंधन टंचाईच्या काळात भारताचा शेजारी देश पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय

राजधानी दिल्लीत दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, ISI चे ९ संशयित दहशतवादी ताब्यात

SCROLL FOR NEXT