Dhule news Saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil News : सर्व योजनांचे पैसे फस्त केले; जयंत पाटील यांचा महायुती सरकारवर निशाणा

Dhule News : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा धुळ्यात आली आहे. त्यानिमित्त धुळ्यामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे

भूषण अहिरे

धुळे : राज्य सरकार दिसेल त्या गोष्टीला हो म्हणत आहे. आता सरकारच्या तिजोरीत पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर आता राज्यात पुढच्या चार महिन्यात कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होताना दिसतील. योजनांचे पैसे देखील त्यांनी फस्त केले असल्याचा आरोप करत जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. 

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा (Dhule) धुळ्यात आली आहे. त्यानिमित्त धुळ्यामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. 

जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत नाटक सुरू आहे 

अजित पवार (Ajit Pawar) यांना महायुतीतून कमी जागा देत डावलेलं जात असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत हे नाटक सुरू असल्याचे म्हटले आहे. जयंत पाटील यांनी अजित पवार यांना महायुतीतून कमी जागा देऊन डावल जात असल्या वर आपले मत व्यक्त करत, एकमेकांना ते कधीच सोडू शकत नाही ते एकच आहेत आणि एकच आहेत; असं मत जयंत पाटील यांनी धुळ्यात व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT