IPL Cricket Betting Saam tv
महाराष्ट्र

IPL Betting: आयपीएलवर सुरू होता सट्टा; माजी नगरसेवकांसह अन्य दोघे ताब्यात

आयपीएलवर सुरू होता सट्टा; माजी नगरसेवकांसह अन्य दोघे ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

धुळे : आयपीएलच्या सामन्यादरम्यान दोंडाईचासह परिसरातील मुलांना मोबाईलवरून सट्ट्याच्या नादी लावणाऱ्या संशयित चौघांना (Dondaicha) दोंडाईचा पोलिसांनी अटक केली. दोंडाईचा येथील बसस्थानकाजवळील हॉटेल गोपालमधील रूम नंबर २०१ मध्ये पोलिस निरीक्षक श्रीराम पवार (IPL Betting) यांच्या पथकाने छापा टाकून संशयितांचा हा डाव उधळला. (Live Marathi News)

आयपीएल क्रीकेट मॅचेस सध्‍या सुरू आहेत. यावर ऑनलाइन सट्टा खेळला जात आहे. त्‍यानुसार दोंडाइचा येथे सट्टा लावला जात असताना पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत आढळलेल्या ९१ हजारांच्या मुद्देमालसह पोलिसांनी माजी नगरसेवक नंदू सोनवणे, संभाजी पाटील, अतुल पाटील यांना अटक केली. दोंडाईचाचे पोलिस निरीक्षक पवार यांना माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक दिनेश मोरे, उपनिरीक्षक शरद लेंडे व हवालदार प्रेमराज पाटील, राजेंद्र सोनवणे हे हॉटेल गोपालमध्ये दाखल झाले.

चौघे ताब्यात

छाप्यात त्यांनी मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स (IPL) या दोन संघांदरम्यान होणाऱ्या २०-२० आयपीएल किक्रेटवर सट्टा खेळणाऱ्यांना मोबाईलद्वारे माहिती देणे व संबंधितांकडून स्वत:च्या फायद्यासाठी जुगार खेळताना तसेच माहिती एका पांढऱ्या रंगाच्या चिठ्ठीवर नोंदवत असताना संशयित चौघांना ताब्यात घेतले. जुगार साहित्यासह सुमारे ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT