bike robbery saam tv
महाराष्ट्र

Crime: चोरीला गेलेल्या दुचाकींसह चोरट्या ताब्‍यात

चोरीला गेलेल्या दुचाकींसह चोरट्या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : सध्या शहरात दिवसागणिक दुचाकी वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दोंडाईचा पोलिसांनी तपासयंत्रणा वापरून या चोरट्यांच्या मुसक्या अवळण्यासाठी कारवाईला सुरुवात केली आहे. त्‍यानुसार दुचाकी चोरांना पोलिसांनी (Police) ताब्‍यात घेतले आहे. (dhule news In the possession of a stolen two wheeler)

दोंडाईचा (Dondaicha) पोलिसांनी गुप्तमहितीच्या आधारे मालपूर येथील १९ वर्षीय तरूण राहूल धनराज काकडे याला ताब्यात घेतले होते. त्याची कसून विचारपूस केली असता या चोरट्याने परिसरातील दुचाकी चोरल्या (Bike Robbery) असल्याचे स्पष्ट झाले. अद्यापही या चोरट्याचा दोंडाईचा पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत असून या चोरट्याने आणखी कुणाच्या मदतीने या चोऱ्या‍या केल्या आहेत; याचा पुढील तपास दोंडाईचा पोलीस करीत आहेत.

सात दुचाकी जप्‍त

चोरट्याने चोरलेल्या दुचाकीपैकी सात मोटर सायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ज्या दुचाकी धारकांच्या दुचाकी चोरी गेलेल्या आहेत. त्यांनी दोंडाईचा पोलिसांशी कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन दोंडाईचा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT