Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: दारूची अवैध वाहतुक; सहा लाखाचा मुद्देमाल जप्‍त

दारू अवैध वाहतुक; सहा लाखाचा मुद्देमाल जप्‍त

भूषण अहिरे

धुळे : ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोनगीर पोलिसांनी (Songir Police) दारूचे बॉक्स भरलेले वाहन जप्तीची कारवाई केली आहे. (Maharashtra News)

धुळे (Dhule) जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारूचा वापर केल्या जाण्याची शक्यता आहे. यात धुळ्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या (Songir) सोनगीर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत सोनगीर टोलनाका येथून वाहनामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोनगीर पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्‍या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सोनगीर टोलनाका या ठिकाणी सापळा रचला.

यादरम्यान माहिती मिळालेले वाहन पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ वाहनाला थांबून तपासणी केली. त्यामध्ये देशी दारूने भरलेले 30 बॉक्स पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान एकाला ताब्यात घेतले असून कारवाईत जवळपास सहा लाख 9 हजार 440 रुपयांचा मुद्दामाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील कारवाई सोनगीर पोलीसांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT