Dhule News Saam tv
महाराष्ट्र

अवैध सावकारी प्रकरणी महिलांसह चौघांवर गुन्हा

अवैध सावकारी प्रकरणी महिलांसह चौघांवर गुन्हा

साम टिव्ही ब्युरो

धुळे : अवैध सावकारी, धनादेश न वटण्याच्या खोट्या केसेस करणे, पठाणी व्याज वसुली आणि मूळ कागदपत्रे परत न केल्या प्रकरणी व्यावसायिकाने तीन महिलांसह चौघांविरूध्द येथील शहर पोलिस (Police) ठाण्यात मंगळवारी (ता. २८) रात्री गुन्हा दाखल केला. (dhule news illegal lending case four persons including a woman fir)

येथील नेहरूनगरमधील रहिवासी, खासगी वाहनचालक आणि जयहिंद महाविद्यालयाजवळील मयूर हॉटेलचे प्रवर्तक मयूर अशोक सोनवणे (वय ३१) यांनी २०१४ ते २०२० या कालावधीत आर्थिक अडचणीमुळे मिल परिसरातील व सध्या (Nashik) नाशिक मुक्कामी असलेले रवींद्र कासूमल खत्री यांच्याकडून वेळोवेळी दीड लाख, तीन लाख, नंतर साडेसात लाखांचे कर्ज घेतले. ते दरमहा आठ टक्के व्याजदराने (Dhule News) घेताना स्टँप पेपर, तो नोटरी करणे, कोरे धनादेश खत्री याला दिले. सोनवणे यांनी वेळोवेळी कर्जाची परतफेड केली.

कर्ज फेडूनही कागदपत्रे परत नाही

मात्र, साडेसात लाख कर्जाचे १६ ते १७ लाख फेडूनही खत्री याने सोनवणे यांची मूळ कागदपत्रे, धनादेश परत केले नाहीत. उलट पत्नी सविता खत्री, प्रिया राकेश शर्मा (रा. कोरेनगर, मिल परिसर), पूजा नरेंद्र वाडेकर (रा. मिरजकरनगर, चाळीसगाव रोड) आणि रवींद्र या चौघांनी संगनमताने धनादेश न वटण्याबाबत, उसनवारीचे पैसे न दिल्याबाबत खोट्या केसेसे केल्या, धमक्या देत रवीद्र याने मयूर हॉटेलवर तोडफोडीचीही धमकी दिली, काही महिला व मुलांना वसुलीसाठी मागे लावेल, अशीही धमकी दिल्याची फिर्याद मयूर सोनवणे यांनी दिली. त्यानुसार संशयित चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

White Hair Care: कमी वयातच केस पांढरे होऊ लागले? मग करा 'हा' घरगुती उपाय, महिन्याभरात दिसेल फरक

Maharashtra Politics : ठाकरेंना काँग्रेस नकोय की काँग्रेसलाच स्वबळावर लढायचंय? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

Thursday Horoscope: पैशाचं नियोजन करा अन्यथा...या राशींच्या व्यक्तींना बसणार आर्थिक फटका, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT