Police patil 
महाराष्ट्र

शंभर गावांचा गाडा पोलिस पाटलांविनाच

साम टिव्ही ब्युरो

कापडणे (धुळे) : धुळे जिल्ह्यात सुमारे शंभरावर पोलिसपाटलांची पदे रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी पोलिसपाटील संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. संघटनेने मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा व धुळे उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिले. (dhule-news-hundred-village-vacant-police-patil-post-later-in-collector-jalaj-sharma)

शंभरावर गावांची पोलिस पाटील ही पदे रिक्त असल्याने शेजारील गावातील पोलिसपाटलांना त्या गावाचे पद सांभाळावे लागत आहे. त्यांना त्या गावातील पाहिजे तेवढी माहिती नसल्याने पोलिस व महसूल प्रशासनाला माहिती देणे अडचणीचे ठरत आहे. ज्या पोलिसपाटलांचे निलंबन झाले आहे. त्यांची योग्य ती माहिती घेऊन पद सुरळीत करणे गरजेचे आहे. निलंबन सुरळीत होण्यासारखे नसेल, तर नवीन पदे भरावीत.

भरती प्रक्रिया करण्याबाबत आश्‍वासन

ज्या पोलिसपाटलांनी राजीनामा दिला आहे, तेथे नवीन पदे भरावीत आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. जिल्हाधिकारी शर्मा व प्रांताधिकारी धोडमिसे यांनी पोलिसपाटील रिक्त पदांची लवकरच भरतीप्रक्रिया सुरू करू, असे आश्वासन दिले, अशी माहिती संघटनेने दिली. दरम्यान, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण देवरे, साक्री तालुकाध्यक्ष रवींद्र बेडसे, उपाध्यक्ष आंनदा पाटील, धुळे तालुका प्रभारी अध्यक्ष संदेश पाटील, धुळे तालुका महिलाध्यक्षा भारती अहिरे, सदस्य आकाश भदाणे, संदीप पाटील, अतुल भामरे आदी उपस्थित होते.

कापडणेला ‘नो पोलिसपाटील’

कापडणे हे धुळे जिल्ह्यातील मोठ्या गावांपैकी एक गाव आहे. वीस हजारांवर लोकवस्तीचा गाडा दहा वर्षांपासून पोलिसपाटीलविना सुरूच आहे. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल हा कारभार विनामोबदला सांभाळत आहेत. मध्यंतरी पोलिसपाटील भरती झाली. त्या वेळीही येथे हे पद भरले गेले नाही. आता तरी हे पद भरावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT