Dhule Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Dhule Heavy Rain : धुळ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; मध्यरात्रीपासून संततधार

Dhule News : धुळे शहर व परिसरात मध्यरात्रीपासून पावसाळा सुरवात झाली. यानंतर पावसाची संततधार सुरु असून आज दुपारी बारा वाजेनंतर पावसाचा जोर वाढला

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. यानंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले असून आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या शेतकरी व मजुरांना देखील परत यावे लागले. 

धुळे (Dhule) शहर व परिसरात मध्यरात्रीपासून पावसाळा सुरवात झाली. यानंतर पावसाची संततधार सुरु असून आज दुपारी बारा वाजेनंतर पावसाचा जोर वाढला असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. काल मध्यरात्रीपर्यंत पावसाची संततधार सुरू होती आणि आज दुपारनंतर पुन्हा (Heavy Rain) पावसाला सुरुवात झाली आहे. 

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसामुळे शेती पिकाला मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच जलसाठ्यांमधील देखील पाण्यात वाढ होणार असल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा पहिला धक्का; अनेक बड्या कंपन्यांनी उत्पादन थांबवलं, भारतावर बेरोजगारीचं संकट?

Cold Water Shower: थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे माहितीये का?

Maharashtra Politics : मनसेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का

Mumbai Airport: मोठी बातमी! मुंबई विमानतळावरील नेटवर्क अचानक गंडलं; प्रवाशांचा उडाला गोंधळ

Maharashtra Live News Update: अंबरनाथमध्ये मनसेला पडणार खिंडार,माजी नगरसेविका अपर्णा भोईर शिवसेनेत करणार प्रवेश

SCROLL FOR NEXT