Dhule Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Dhule Rain: धुळे तालुक्यात मुसळधार पाऊस; पुराचे पाणी गोठ्यात शिरल्याने सात गुरांसह बकऱ्यांचा मृत्यू

Dhule Weather News: दिवसभर कडक उन्हाचे चटके व उष्णतेच्या झळा जाणवल्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढगांनी गर्दी केली होती. यानंतर काही वेळाने पावसाला सुरवात

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात रात्रीच्या सुमारास मुसळधार व अति मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नाल्यांना  होता. दरम्यान अचानक नाल्याचे पाणी गोठ्यात शिरल्याने यामध्ये शेतकऱ्याच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

दिवसभर कडक उन्हाचे चटके व उष्णतेच्या झळा जाणवल्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढगांनी गर्दी केली होती. यानंतर काही वेळाने पावसाला सुरवात झाली. तर रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. यात धुळे (Dhule) तालुक्यातील कापडणे शिवारात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यांना पाणी आले होते. (Heavy Rain) नाल्याचे पाणी गोठ्यात शिरल्याने कापडणे शिवारातील पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

मध्यरात्रीच्या सुमारास नाल्याचे पाणी गोठ्यात शिरले. त्यावेळी पाऊस सुरू असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. मोठ्या प्रमाणात पाणी गोठ्यात शिरल्यामुळे जवळपास सात गुरे त्याचबरोबर दहाहून अधिक कोंबड्या व तीन ते चार बोकड मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने याची दखल घ्यावी. लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT