Dhule Temperature Saam tv
महाराष्ट्र

Dhule Temperature : धुळ्यात तापमान चाळीशी पार कायम; जळगावमध्ये मात्र तापमान आले खाली

Dhule News : धुळे जिल्ह्यातील तापमान मागील आठवड्यात ४२ अंशांच्या वर कायम होते. मात्र काल कमी झालेला तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढला आहे. आज ४१ अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली

भूषण अहिरे

धुळे : मागील आठवड्यात खानदेशात उष्णतेची लाट पसरलेली होती. धुळ्यासह जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील तापमान चाळीस अंशाच्या वर गेलेला होता. दरम्यान धुळ्यातील तापमानात दोन दिवसांपासुन घट झाली होती. मात्र पुन्हा एकदा तापमानाचा पारा ४० अंशाच्या पार गेल्याने उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. तर जळगाव जिल्ह्यातील तापमान काहीसे खाली आल्याने उष्णतेच्या झळांपासून सुटका झाली आहे. 

धुळे जिल्ह्यातील तापमान मागील आठवड्यात ४२ अंशांच्या वर कायम होते. मात्र काल कमी झालेला तापमानाचा पारा धुळ्यात पुन्हा एकदा वाढला आहे. आज धुळ्यात ४१ अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल तापमानाचा पारा ३९ अंशावर खाली गेला होता. त्यामुळे धुळेकरांना उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु आज पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढल्यामुळे धुळेकरांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत आहे. 

तापमानाचे चटके कायम 
तापमानामध्ये उतार चढाव सुरूच असून उन्हाचे चटके धुळेकरांना मात्र सहन करावा लागत आहेत. गेल्या चार ते पाच दिवस तापमानाचा पारा हा प्रचंड वाढलेला होता. परंतु काल तापमानाचा पारा ३९ अंशावर गेल्यामुळे आता धुळेकरांना दिलासा मिळणार अशी आशा धुळेकरांना वाटू लागली होती. मात्र आज पुन्हा एकदा तापमानाचा पारा ४१ अंशांवर गेला असल्यामुळे धुळेकरांना तापमानाचे चटके सहन करावा लागत आहेत.

जळगावच्या तापमानात घसरण 

जळगाव जिल्ह्याचे तापमान देखील ४२ अंशापर्यंत गेले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मागील आठवड्यात ४२ अंशावर गेलेले तापमान आता ३९ अंशापर्यंत खाली आले आहे. मात्र येत्या काही दिवसात तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT