Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: साक्री तालुक्यात गारपिट; शेतात साचला बर्फाचा खच, पिकाचे अतोनात नुकसान

साक्री तालुक्यात गारपिट; शेती पिकाचे अतोनात नुकसान

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यामध्ये सोमवारी दुपारनंतर झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात (Dhule News) नुकसान झाले आहे, यात प्रामुख्याने मका, गहू, हरभरा, तसेच आंबा व पपई या पिकांना प्रामुख्याने चांगलाच फटका बसला आहे. (Tajya Batmya)

सोमवारी दुपारनंतर अचानकपणे अवकाळी पावसाने साक्री तालुक्यामध्ये निजामपूर तसेच टिटाने या परिसरामध्ये जोरदार हजेरी लावली. जवळपास तासभर चाललेल्या या गारपीट व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

गारपिटीने बर्फाचा खच

शेतामध्ये गारपिटीमुळे बर्फाचा खर्च साचल्याने कांदा पीक अक्षरशः सडून जाण्याची भीती असल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. या गारपिटीमुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगे पाटलांनी आधी ऐकवली कॉल रेकॉर्डिंग, आता धनंजय मुंडेंचा कांचनसोबतचा फोटो व्हायरल

Saturday Horoscope : जुने संकल्प पूर्ण करा, काम लांबवण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात अडचणी येतील, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Diabetic Tips: तुम्हीपण मधुमेहाचे रुग्ण आहात? मग 'या' पदार्थाचं सेवन करणं ठरेल फायदेशीर

Maharashtra Live News Update:वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण; ठाण्यातील कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांचे प्रेरणादायी भाषण

Mumbai To Ekvira: मुंबई ते एकवीरा प्रवास कसा कराल? जाणून घ्या सर्वात सोयीस्कर मार्ग आणि टिप्स

SCROLL FOR NEXT