Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : मुख्‍यमंत्री येण्यापुर्वीच ५० खोके एकदम ओकेच्‍या घोषणा; ठाकरे गटाचे शिवसैनिक ताब्‍यात

मुख्‍यमंत्री येण्यापुर्वीच ५० खोके एकदम ओकेच्‍या घोषणा; ठाकरे गटाचे शिवसैनिक ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : राज्‍याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासन आपल्‍या दारी या कार्यक्रमासाठी धुळ्यात (Dhule) येत आहेत. मात्र ते पोहोचण्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवसैनिकांनी (Shiv Sena) दत्त मंदिर चौक परिसरात ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्‍या. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलीस प्रशासनाने तात्काळ ताब्यात घेतले. (Breaking Marathi News)

शासन आपल्या दारी हा राज्य सरकारचा कार्यक्रम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये धुळ्यात आज पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी तयारी ही करण्यात आली. पुढील काही वेळात (Eknath Shinde) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम स्थळी दाखल होऊन या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

परंत, कार्यक्रमाला मुख्‍यमंत्री शिंदे हे येतील यापुर्वीच ठाकरे गटाच्‍या शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच धुळे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून सुरू असलेला भ्रष्टाचार रोखण्याची मागणी केली आहे. यावेळी पोलिसांनी (Police) शिवसैनिकांना ताब्‍यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समुद्रकिनारी आढळला पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह; मुंबईत खळबळ

Kalyan Shiv Sena : 'उद्याच २५ लाख दे, नाहीतर...' शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाणे जिल्ह्यात पुन्हा खळबळ

Accident : बॉलिवूड अभिनेत्रीचा परदेशात भयानक अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा दणका! गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर

Constant Fatigue And Headache: सतत थकवा अन् डोकेदुखी? 'हे' 6 बदल शरीरात दिसताच व्हा सावध; दुर्लक्ष केल्यास पडेल महाग

SCROLL FOR NEXT