Dhule LCB Action Saam tv
महाराष्ट्र

Dhule LCB Action : सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त; धुळे एलसीबीची कारवाई

dhule News : सोनगीरकडून धुळ्यामार्गे ट्रकमधून राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली

साम टिव्ही ब्युरो

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावरून होणारी गुटख्याची तस्करी रोखत (Dhule) नगावबारी परिसरात सव्वादोन लाखांचा गुटखा व पाच लाखाचा ट्रक, असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Breaking Marathi News)

सोनगीरकडून धुळ्यामार्गे ट्रकमधून राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती (Dhule LCB) ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावरील शहरातील नगावबारी शिवारात सापळा रचून संशयित ट्रकला ताब्यात घेतले. चालकाने त्याचे नाव शाहरुख खान नसीरखान (रा. रौनकाबाद, मालेगाव) असे सांगितले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

७ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त 

ट्रकची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा मिळून आला. कारवाईत ‘एलसीबी’ने ७७ हजार ७९२ रुपये किमतीच्या ८ गोण्या, १३ हजार ७२८ रुपयाच्या ८ गोण्या, २१ हजार ७८० रुपयाच्या ५ गोण्या, ९४ हजाराच्या १० गोण्या, ट्रक असा एकूण ७ लाख १५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT