Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : बिल काढण्यासाठी ग्रामसेविकेने मागितली लाच; १५ हजार स्वीकारताना ताब्यात

Dhule News : ग्रामपंचायतीचे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण केले. तसेच गावातील रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले.

साम टिव्ही ब्युरो

धुळे : धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील चौगाव बुद्रुक येथील ग्रामसेविका राजबाई पाटील यांना १५ हजाराची (Dhule) रक्कम स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Dhule ACB) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील चौगाव बुद्रूक येथील तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीचे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण केले. तसेच गावातील रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले. या दोन्ही कामांच्या खर्चाचे बिल सादर करून देखील त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते. यामुळे तक्रारदार यांनी एक महिन्यापूर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेऊन केलेल्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली. यावेळी ग्रामसेविका पाटील यांनी तक्रारदाराकडे बिल काढून देण्यासाठी २५ हजाराची मागणी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

तक्रारदाराने याबाबत धुळे लाचलुचपत विभाग कार्यालयाकडे यासंदर्भात ४ एप्रिलला तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी दरम्यान ग्रामसेविका पाटील यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच (Bribe) स्वीकारण्याचे मान्य केले होते. दरम्यान १५ एप्रिलला सदरची रक्कम शिंदखेडा येथील राहते घरी स्वीकारताना ग्रामसेविका पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. हि कारवाई धुळे लाचलुचपत विभागाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT