Grampanchayat Election 2023 Saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election 2023: शिंदखेडा तालुक्यातील मतदान केंद्रावर गोंधळ; चिन्ह असलेली चिठ्ठी आणल्याचा आक्षेप

Dhule News : मतदान केंद्रावर उमेदवाराचे चिन्ह असलेली चिठ्ठी आणण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत एकच गोंधळ घातलाआणल्याचा आक्षेप

Rajesh Sonwane

धुळे : ग्रामपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळपासून शांततेत मतदान सुरु असून शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील मांडळ येथील मतदान केंद्रावर अचानक गोंधळ उडाला. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवाराच्या कारकर्त्यांनी गोंधळ घातला. यामुळे काहीवेळ (Dhule)  मतदानाची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. (Tajya Batmya)

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मांडळ गावात मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांनी घोंधळ घातल्याचे पाहण्यास मिळाले. मतदान केंद्रावर (Grampanchayat) उमेदवाराचे चिन्ह असलेली चिठ्ठी आणण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत एकच गोंधळ घातला. मतदान केंद्रावर गोंधळ उडताच बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना मध्यस्थी करत मतदान केंद्रापासून बाजूला नेत तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला. मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांनी राडा केल्याने मतदान केंद्रा बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही वेळ मतदान प्रक्रिया स्थगित 
बाहेर गोंधळ होताच मतदान प्रक्रिया काही काळासाठी  थांबवण्यात आली होती. परंतु तणाव शांत होताच पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनातर्फे या ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT