Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: राष्ट्रवादीतर्फे गद्दार व खोके दिवस साजरा; शिंदे फडणवीस सरकारचा केला निषेध

राष्ट्रवादीतर्फे गद्दार व खोके दिवस साजरा; शिंदे फडणवीस सरकारचा केला निषेध

भूषण अहिरे

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज शिंदे व फडणवीस सरकार विरोधामध्ये जागतिक गद्दार व खोके दिवस साजरा करण्यात आला आहे. (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत खोके (Dhule) दाखवत आणि त्यावर निषेधाचे मॅसेज झळकवले. (Latest Marathi News)

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यासह ४० आमदारांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारला मोठा धक्का दिला होता. यानंतर शिंदे– फडणवीस सरकार स्‍थापन झाले. या सरकारच्या स्थापनेनंतर शिंदे व फडणवीस सरकारला गद्दार व खोके सरकार म्हणून महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांतर्फे संबोधित करण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी या नावाने निषेध देखील शिंदे व फडणवीस सरकारचा करण्यात आला आहे.

आजचा दिवस गद्दार व खोके दिवस म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे साजरा करण्यात आला आहे. धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तसेच शिंदे व फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आज गद्दार व खोके दिवस साजरा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT