Anil Gote Saam tv
महाराष्ट्र

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Dhule News : धुळ्यात आमदारांच्या नावावर गोळा केलेले १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये एका आमदाराच्या पीएच्या खोलीत सापडले. या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली

भूषण अहिरे

धुळे : राज्यात भ्रष्टाचाऱ्याला जेलमध्ये टाकू, या घोषणेचा अर्थ आता भ्रष्टाचार करणाऱ्याला भाजपात घेऊ' असा झाला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेलचा पत्ता आता भाजप कार्यालय आहे का? अशा बोचऱ्या शब्दांत ठाकरे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी आज फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

धुळ्यात आज माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान धुळे येथील शासकीय रेस्ट हाऊसमध्ये एका आमदाराच्या स्वीय सहाय्यकाकडे सापडलेल्या पावणे दोन कोटी रुपयांच्या गंभीर प्रकरणावर विधानसभेतील एकही आमदार तोंड उघडत नसल्याने, हे सर्व लोकप्रतिनिधी लाचार झाले आहेत, असा घणाघाती आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.  

धुळ्यातील प्रकरणावर कोणी न बोलणे शरमेची बाब 

विधानसभेत काही हजार किंवा लाखांचा भ्रष्टाचार झाला; तरी आमदार आकाश- पाताळ एक करतात. सभागृहाचे कामकाज बंद पाडतात. पण धुळ्यात आमदारांच्या नावावर गोळा केलेले १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये एका आमदाराच्या पीएच्या खोलीत सापडले. या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. पण त्यावर विधानसभेत अद्याप एकाही आमदाराने प्रश्न विचारलेला नाही ही अत्यंत शरमेची बाब असल्याचे म्हटले आहे.

स्वपक्षातील आमदारांवरही साधला निशाणा 

यावेळी बोलताना गोटे यांनी स्वपक्षातील आमदारांना देखील घरचा आहेर दिला आहे. सर्वच आमदार चोर आहेत, एकमेकांच झाकण्याशिवाय त्यांच्याकडे काम नाही. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात कोणीच ऊरला नाही; असे म्हणत धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणासंदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये कोणीही आवाज का उठवला नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांसह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार रोहित पवार व भास्कर जाधव यांना याबाबत सभागृहात मुख्यमंत्र्यांना विचारणा करावी; असे सांगितले होते. मात्र त्यांना सांगून देखील कोणीही यावर अधिवेशनात प्रश्न विचारला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT