Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू; शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीती

Dhule News : बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू; शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीती

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यातील बोरकुंड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. यामुळे (Farmer) शेतकऱ्यांमध्ये भीतीचे (Dhule) वातावरण निर्माण झाले असून शेतकरी शेतात जात नसल्याने शेतीची कामे खोळंबली असल्याचे पाहावयास मिळत आहे. (Breaking Marathi News)

धुळे तालुक्यातील बोरकुंड परिसरामध्ये शेतकऱ्याच्या पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे बिबट्याचा हल्ला (Leopard Attack) झाल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर आता बिबट्यांचा हैदोस पुन्हा एकदा बोरकुंड परिसरात सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिबट्याच्या हल्ल्यानंतर शेती कामासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण बोरकुंड परिसरात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण बघावयास मिळत आहे. त्यामुळे सध्या शेतात शेतकरी कामासाठी जाण्यासाठी घाबरत असून शेतीची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT