Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : झोपडीला अचानक आग; भावासह बहिणीचा होरपळून मृत्यू

Dhule News : जनावरांना पाणी पाजल्यानंतर त्या आपल्या झोपडीकडे आल्या असता, त्यांना झोपडीला आग लागल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केली.

साम टिव्ही ब्युरो

धुळे : धुळे तालुक्यातील लोणखेडी येथे घराला अचानक आग लागली. या  घटनेत घरात असलेल्या भावासह बहिणीचा होरपळून (Death) मृत्यू झाला. याप्रकरणी (Dhule) धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली. आगीचे कारण समजू शकले नाही. (Latest Marathi News)

धुळे तालुक्यातील लोणखेडी या गावात नाना पवार हे परिवारासह एका झोपडीत वास्तव्यास आहेत. शेतमजुरी करून परिवार आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान शेतीच्या कामासाठी परिवार घराबाहेर होता. यावेळी झोपडीत नाना पवार यांचा मुलगा अमोल पवार (वय ७) आणि रिना पवार (वय ४) हे भाऊ- बहीण खेळत होते. तर त्यांची आजी सताबाई जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. जनावरांना पाणी पाजल्यानंतर त्या झोपडीकडे आल्या असता, त्यांना झोपडीला आग (fire) लागल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केली. झोपडीत माझी नातवंडे असल्याचे त्यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुले मदतीला धावली पण.. 
आरडाओरडा ऐकून क्रिकेट खेळणारी मुले घटनास्थळी धावली. मात्र, आग विझविण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची साधने नव्हते. यामुळे आगीत झोपडी काही क्षणात जळून खाक झाली. आगीचा ढिगारा बाजूला केल्यानंतर अमोल व रिना या दोघांना बाहेर काढले. ते आगीमुळे ते दोघेही भाजले गेले होते. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका (Police) पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Yoga Exercise: चष्मा कधीच लागणार नाही, घरीच करा हे 5 योगा

मराठवाड्यातील भयान वास्तव! महिन्यात ७६ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले, सर्वाधिक संख्या बीडमधील

Viral Video: ४ वर्षांचा चिमुकला अंगणवाडीतच अडकला; आई-बाप रात्रभर शोधत बसले, सकाळी कुलुप उघडलं...!

Maharashtra Live News Update: अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुविधा एप्रिलपासून होणार सुरू

Health Care : महिलांनी पपई कधी खाऊ नये, नेमकं कारण काय? काय होतील परिणाम?

SCROLL FOR NEXT