Dhule Police Saam tv
महाराष्ट्र

Dhule Police : धुळ्यात बनावट दारूचा मिनी कारखाना उध्वस्त; सहा जण मुद्देमालासह ताब्यात

Dhule News : बनावट दारू निर्मित करून विक्री करण्यात येते या अनुषंगाने बनावट दारु तयार करणाऱ्या कारखान्यांचा शोध घेवून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील जामचा मळा परिसरात सुरू असलेला बनावट दारुचा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत उध्वस्त केला आहे. या कारवाईत घटनास्थळावरून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दारू विक्री करण्यास बंदी आहे. असे असताना देखील अनेक ठिकाणी दारूची निर्मिती केली जात असते. त्यातच बनावट दारू निर्मित करून त्याची विक्री करण्यात येत असते. या अनुषंगाने बनावट दारु तयार करणाऱ्या कारखान्यांचा शोध घेवून कारवाई करण्याचे निर्देश धुळ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्याच्या चाळीसगाव रॉड परिसरातील कारखान्यावर छापा टाकत कारवाई केली. 

बनावट दारू कारखान्यावर छापा 

पोलिसांना माहिती प्राप्त करीत असतांना आज स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती. धुळे शहरात सुमैय्या हॉलचे पाठीमागे जामचा मळा येथे बनावट दारूचा कारखाना सुरु असल्याचे समजले. त्यानुसार शेख जावेद शेख मोहम्मद ऊर्फ जावेद नक्टया हा त्याचे राहत्या घरात बेकायदेशीररित्या देशी बनावटीची दारु अवैधरित्या तयार करुन तिची गुजरात राज्यात व इतर ठिकाणी निर्यात करीत असल्याची माहिती मिळाली होती. 

मुख्य सूत्रधार अद्याप फरार 

या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी जवळपास आठ लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी संबंधित ठिकाणाहून हस्तगत केला आहे. तसेच सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र या गुन्हातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT