Fake Notes Saam tv
महाराष्ट्र

Fake Notes : चार लाखांच्या बनावट नोटा जप्त; शिरपूर पोलिसांकडून तिघेजण ताब्यात

Dhule news : पोलिसांनी त्या नोटांची बारकाईने तपासणी केली असता या सर्व नोटा बनावट असल्याचे पोलिसांच्या तपासा दरम्यान उघडकीस आले आहे. यासंदर्भात तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

भूषण अहिरे

धुळे : बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली आहे. अशाच प्रकारे शिरपूर पोलिसांनी बनावट नोटांसह तिघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ४ लाख ११ हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु असून पोलिसांचे एक पथक गुजरातकडे रवाना झाले आहे.  

बनावट नोटा चलनात आणणारे सक्रिय झाले आहेत. प्रामुख्याने पाचशे रुपयांच्या बनावट नोटा पाहण्यास मिळत आहेत. दरम्यान शिरपूर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना या दरम्यान एका दुचाकीवर तीन जण संशयास्पद रित्या आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवत त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून संशयास्पद उत्तर मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तपासणी केली. यात त्यांच्याजवळ बनावट नोटा आढळून आल्या. 

चार लाखाहून अधिकच्या बनावट नोटा जप्त 

पोलिसांनी या तिघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये पाचशे रुपयांच्या ८२३ नोटा पोलिसांना आढळून आल्या आहेत. पोलिसांनी त्या नोटांची बारकाईने तपासणी केली असता या सर्व नोटा बनावट असल्याचे पोलिसांच्या तपासा दरम्यान उघडकीस आले आहे. यासंदर्भात तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे असलेले जवळपास ५०० रुपयांच्या चार लाख ११ हजार पाचशे रुपयांच्या नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या. 

पोलिसांचे पथक गुजरातला रवाना 

या कारवाईदरम्यान शिरपूर पोलिसांनी जवळपास ५ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या सर्व बनावट नोटा गुजरात येथील असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून यासंदर्भात अधिक तपास करण्यासाठी पोलिसांचे तीन पथक गुजरातकडे रवाना करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आणि महाआरती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये हाजीपूरमध्ये बिघाड? ४ मिनिटं एकाच जागी हवेत हेलकावे, उपमुख्यमंत्रीही सोबत, राजकारणात खळबळ

Sunday Horoscope: उत्साहाने दिवसाची सुरुवात होणार; 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT