Fake Notes Saam tv
महाराष्ट्र

Fake Notes : धुळ्यात २६ हजार रुपयांच्या बनावट नोटा; एकजण पोलिसांच्या ताब्यात

Dhule News : मागील महिन्यात शिरपूर येथे पोलिसांनी कारवाई करत तब्बल ४ लाख ११ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या होत्या. यानंतर पुन्हा धुळे शहरामध्ये बनावट नोटा आढळून आल्या

भूषण अहिरे

धुळे : चलनात बनावट नोटा आणून त्याद्वारे फसवणूक केली जात असते. अशी बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय असून धुळ्यामध्ये २६ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. भारतीय चलनातील बनावट नोटांसह एका इसमाच्या धुळ्याच्या आझाद नगर पोलिसांनी ताब्यात घेत नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 

बनावट नोटा चलनात आणल्या जात आहेत. या नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय झाली असून धुळे जिल्ह्यात मागील महिन्यातच पोलिसांनी कारवाई केली होती. मागील महिन्यात शिरपूर येथे पोलिसांनी कारवाई करत तब्बल ४ लाख ११ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या होत्या. यात चौघांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर पुन्हा धुळे शहरामध्ये बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडली आहे. 

पारोळा चौफुलीवर पोलिसांची कारवाई 
भारतीय चलनातील २५ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटांसह एका इसमाच्या आझाद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आझाद नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा चौफुली या ठिकाणाहून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची अंग झडती घेतली असता त्याकडे भारतीय चलनातील २५ हजार ९०० रुपयांच्या ५००, २०० व १०० रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या आहेत. 

पोलिसात गुन्हा दाखल 
दरम्यान एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून यासंदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित इसमाने या बनावट नोटा कुठून आणल्या?, त्याच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या बाबत पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT