Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: कार्यकारी अभियंता विरोधात लेखणी बंद; सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

कार्यकारी अभियंता विरोधात लेखणी बंद; सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता महिला अधिकारी विरोधात कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संबंधीत अधिकाऱ्यास (Dhule News) सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी करत लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. (Breaking Marathi News)

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी या महिला अधिकारी विरोधात कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या महिला अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवावे या मागणीसाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळ्याफिती लावून लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे.

अधिकारी विरोधात घोषणाबाजी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देखील देण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या सर्व आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. जोपर्यंत संबंधित महिला अधिकारीस सक्तीच्या रजेवर पाठवणार नाही; तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT