महाराष्ट्र

इलेक्ट्रॉनिक युगातही ग्रामीण भागात फिरतेय जुन्या काळातील जातं

इलेक्ट्रॉनिक युगातही ग्रामीण भागात फिरतेय जुन्या काळातील जातं

साम टिव्ही ब्युरो

धुळे : जसजसा काळ बदलतोय तसतसे नवनविन तंत्रज्ञान ऊदयास येत आहे. परंतु या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही काही जुन्या जमान्यातील वस्तुंचा आजही वापर होताना दिसत असल्याने ‘जुनं ते सोनच’ म्हणावे लागेल. ‘घरघरते बाई जातं, पाहटेच्या पारी’ हे चित्र आजही ग्रामिण भागात पाहावयास मिळत असल्याने खेडोपाड्यात अजुनही संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. (dhule-news-Even-in-the-electronic-wandering-in-rural-areas-goes-back-to-the-old-days)

सध्या दळणाची असंख्य यंत्र, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य उपलब्ध असून ग्रामीण भागात मात्र दाळी साळी भरडण्यासाठी जातं फिरताना बघावयास मिळते. आजच्या धकाधकीच्या काळात विजेवर चालणारी अनेक यंत्र विकसित झालेली आहेत. परंतु आजही रुचकर व चविष्ट व स्वादिष्ट जर खान पान करायचे असेल तर ग्रामीण भागात जात्यावर दळण दळणे, चुलीवर भाकरी करणे, मातीच्या भांडी हंडी/मडकी, भाजी करणे इतकेच काय तर भाजीसाठी लागणारे वाटणही दगडी पाट्यावर वाटले जाते. जुन्या काळातील दळणाची अनेक साधने उपलब्ध असून त्याचा वापर आजही ग्रामीण भागात केला जातो. आधी मिक्सर, पिठाची गिरणी, गॅस आदि साहित्याचा शोध नव्हता. त्यामुळे त्या काळात चुल, पाटे-वराटे, जाते याचा वापर होता. ग्रामीण भागातील माता भगिनी, वयोवृद्ध महिला जात्यावर उडीत भरडताना दिसत आहेत.

पाट्यावरचं वाटन अन्‌ चुलीवरची भाकरी

पाट्यावरचं वाटन आजही भाजीला चव आणताना दिसते. चुलीवरची त्या काळातील भाजली जाणारी भाकर आजच्या धकाधकीच्या काळातही तेवढीच लोकप्रियता टिकवून असल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये चुलीवरच्या भाकरीचीच मागणी होताना दिसते. खलबत्त्यात कांडलेले धान्य, चटणी ही वेगळीच चव देत असल्याने या साधनांचा आजही प्रामुख्याने खेड्यात वापर होताना दिसतो. जत्रेमध्ये या मातीच्या भांड्यांचे दुकान थाटायची, खेड्यापाड्यातुन जाते, पाटे वरोडे, खलबत्ते आदी साहित्याची खरेदी व्हायची. आजही काही जत्रांमध्ये या वस्तू विकावयास उपलब्ध असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT