Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: तरुणाई नशेच्या जाळ्यात; धुळ्यात वाढला नशेचा बाजार

तरुणाई नशेच्या जाळ्यात; धुळ्यात वाढला नशेचा बाजार

भूषण अहिरे

धुळे : तरुणाई नशेच्या जाळ्यात अडकत असून धुळ्यात नशेचा खुलेआम बाजार नशेच्या सौदागरांकडून भरवला जात आहे. यामुळे (Dhule) धुळ्यातील तरुण वर्ग या नशेच्या पदार्थांच्या चांगलाच आहारी गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे धुळ्यातील (Dhule News) गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. (Letest Marathi News)

धुळ्यात विविध औषधांचा त्याचबरोबर इतर शालेय साहित्यांचा उपयोग (Crime News) नशेसाठी सर्रासपणे केला जात आहे. विशेष म्हणजे ही नशा करण्यासाठी तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे पोलीस (Police) तपासात उघडकीस आले आहे,

नशेसाठी औषधांच्‍या बाटल्‍यांचा वापर

धुळ्यात गेल्या काही महिन्यांमध्ये विविध औषधांच्या बाटल्या या नशेसाठी अवैधपणे विक्री केल्या जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या विरोधात धुळे पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात औषधांच्या बाटलांचा साठा देखील जप्त केला असून या नशेचा बाजार मांडणाऱ्या आरोपींच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत.

गुन्‍हेगारी वाढली

नशा करून नशेखोर तरुण मागचा पुढचा काहीच विचार न करता चोरी, खून, दरोडा, जबरी लूट अशा विविध गुन्ह्यांमध्ये अडकत चालले आहेत. ही नशा समाजासह या तरुणांच्या शरीराला देखील घातक ठरत असल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT