Dhule Rain Alert Saam tv
महाराष्ट्र

Dhule Rain Alert : धुळे जिल्ह्याला यलो अलर्ट; या भागात राहील पावसाचा जोर अधिक

Dhule news : आठवड्यांपूर्वी धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. मध्यंतरी तीन- चार दिवस पावसाने उघडीप दिली होती. मात्र आता कालपासून पुन्हा पावसाला सुरवात झाली

भूषण अहिरे

धुळे : हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानुसार धुळे शहरासह जिल्हाभरात पावसाचा जोर आज अधून मधून बघावयास मिळत आहे. दरम्यान रात्रीपासून सुरु असलेला आज सकाळी देखील पडत होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

आठवड्यांपूर्वी धुळे (Dhule) जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. मध्यंतरी तीन- चार दिवस पावसाने उघडीप दिली होती. मात्र आता कालपासून पुन्हा पावसाला सुरवात झाली असून हवामान विभागाकडून जिल्ह्याला येलो अलर्ट जारी (Rain Alert) करण्यात आला आहे. या अंदाजानुसार पावसाची रिपरिप कायम असल्याचे दिसून येत आहे. धुळे शहरासह धुळे, साक्री तालुक्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तविली आहे. अधून मधून पावसाचा जोर हा धुळे शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी बघावयास मिळत असून यामुळे जनजीवनावर देखील याचा परिणाम होताना दिसून येत आहे,

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आपल्या लाडक्या सर्जाराजाची तयारी करणे देखील या पावसाच्या रिपरिपमुळे कठीण होऊन बसले आहे. पावसाचा जोर अशाच प्रकारे पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

SCROLL FOR NEXT