Dhule corporation 
महाराष्ट्र

Dhule : महापालिका प्रवेशद्वारावर शिवसेनेने मांडले घट; नऊ दिवस प्रशासनाविरोधात आंदोलन

महापालिका प्रवेशद्वारावर शिवसेनेने मांडले घट; नऊ दिवस प्रशासनाविरोधात आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : धुळे महानगरपालिकेला शास्‍ती माफीतून मिळालेल्‍या रक्‍कमेतून शहरातील खड्डे बुजविण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र असे न झाल्‍याने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेतर्फे घट मांडून पालिका प्रशासनाचा निषेध करत नऊ दिवसांच्‍या आंदोलनाला सुरवात केली. (dhule-news-dhule-corporation-Shiv-Sena-proposes-reduction-at-entrance)

गेल्या आठवड्यात लोकअदातीलच्या माध्यमातून शास्ती माफी दिल्याने धुळे महापालिकेच्या तिजोरीत ८५ लाख रुपये जमा झाले होते. या रकमेतून ठेकेदारांची खोटी बिले काढण्यापेक्षा त्यात आणखी काही रक्कम टाकून शहरातील खड्डे बुजविण्यात यावे; अशी मागणी शिवसेनेने केली होती. तसेच मागणीची दखल न घेतल्यास घटस्थापनाच्या दिवशी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर घटस्थापना करुन नवरात्रीचे नऊ दिवस आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील दिला होता.

ठिय्या आंदोलनाला सुरुवात

शिवसेनेने अल्टीमेटम देऊनही महापालिकेने या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेसमोरच आज घटनास्थापना करून नऊ दिवसांच्या ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. धुळे महापालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेतर्फे पालिका प्रशासनाच्या प्रवेशद्वारावर घट मांडून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT